सगळ्यात पहिलेतर डॉ. तुमचे खूप खूप आभार जे माझ्या वडिलांचे कठिण अशी मणक्याची शस्त्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडलीत, तुम्ही जेवढे गोड बोलता तेवढेच तुम्ही स्वभावाने ही गोड आहात,जेव्हा तुम्ही मला असे सांगीतले की माझ्या वडिलांची अशा-अशाप्रकारे शस्त्रक्रिया करायची आहे व एवढे पैसे लागतील तेव्हा माझ्या पाया खालची जमीनच सरकली पण तुम्ही मला ज्या प्रकारे समजविले आणि आधार दिला आणि असेही मला तुम्ही म्हणालात की, तुझ्याकडे पैसे नसतील तर मी देतो पैसे पण बाबांची शस्त्रक्रिया ही वेळेत पार पडली पहिजे व बाबा व्यवस्थित होऊन पहिल्यासारखे चालले पाहिजेत हिच माझी इच्छा आहे हे असे तुमचे शब्द होते आणि तुम्ही मला पैशांसाठी जराही घाई केली नाहीत आणि माझ्या वडिलांच्या मणक्याची शस्त्रक्रिया लवकरात लवकर आणि व्यवस्थितरित्या पार पाडलीत आणि अत्ता ते तुमच्यामुळेच खूप चांगले चालतात आणि स्वतः सगळी कामे करतात या वयात सुद्धा,
डॉ. तुमचे एका शब्दात कौतूक करायचे ते म्हणजे तुम्ही,,, 💫
🙏देवमाणूस 🙏